About Us

अकोल्याचे पहिले वकील नामदेवराव पोहरे यांनी १ ऑक्टोबर १९२२ रोजी विजयादशमीला मराठा मंडळाची स्थापना केली व शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. मराठा बोर्डींगच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास पुढे कायदेशीररित्या मराठा मंडळ या संस्थेच्या निर्मितीमधे परिवर्तित झाला.

मंडळाच्या अनेक उपक्रमांपैकी १९९० मधे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरूवात ही एक महत्वाची उपलब्धी आहे. माफक शुल्क घेऊन या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते. शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवायचे असेल तर विद्यालयाला पर्याय नाही, त्याचबरोबर आजच्या युगात मुलांचे बालपण हिरावले जाऊ नये याची काळजी विद्यालयाने घ्यायला हवी. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचाच नागरिक आहे. हे लक्षात घेऊन काळानुसार योग्य ते बदल संस्था करत राहीलच.
शुभेच्छा

 

 प्रकाश पोहरे